35 पैकी 32 निगेटिव्ह 3 प्रलंबित

बीड जिल्ह्यातून आज दि. २१ रोजी कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी पाठविलेले ३५ स्वॅब नमुन्यांपैकी ३२ स्वॅब नमुने अहवाल प्राप्त झाले असून निगेटिव्ह आले आहेत तर ३ स्वॅब नमुने अहवाल प्रलंबित आहे

सलग पाच दिवस सुरु असलेले कोरोनाचे मीटर गुरुवारी दुपारनंतर मात्र थांबले असून बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेले ३२ नमूने निगेटिव्ह आले आहेत. तर ३ प्रलंबित आहेत.लातूरच्या प्रयोगशाळेने हे अहवाल दिले आहेत.
बीड जिल्ह्यात मागच्या पाच दिवसात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत होते. गुरुवारी बीड जिल्ह्यातून ३५ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे सर्व अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यातील ३२ निगेटिव्ह आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!