आजही 32 अहवालाची प्रतीक्षा;आढळलेले सर्वच रुग्ण बाहेरून आलेलेच

बीड
कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वब तपासण्यात येत असतात बीड जिल्ह्यात 24 कोरोना बाधीत सापडले त्यातून 7 जण हे बाहेरील जिल्यातील असल्याने ते बीड जिल्ह्यातील यादीतून वगळण्यात आले आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यात केवळ 17 ही संख्या आहे या रुग्णाच्या संपर्कातील 113 जणांचे नमुने काल पाठवण्यात आले होते त्यात 4 पॉजिटीव्ह आढळून आले तर 90 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यात 6 संशयित होते आज 32 जणांचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले असून यात बीड शहरातील 21 नमुने आहेत त्यामुळे या रिपोर्ट कडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान काल बीड शहरातील दोन गल्ल्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या असून नागरिकांनी आता गर्दीच्या ठिकाणी कुणाच्या संपर्कात न येता सुरक्षित अंतर ठेवूनच राहावे,आतापर्यंत सापडलेले सर्व बाधीत रुग्ण हे बाहेर गावातून आलेलेच आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!