जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या जवळ, 20 लाखांहून अधिक बरे झाले

मुंबई : जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 51 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 99,685 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं 4,738 बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 3 लाख 29 हजार 292 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20 लाख 20 हजार 151 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.

वर्डोमीटरच्याआकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 112,028 रुग्ण, तर 3,434 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 59,028 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 41,968 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
Coronavirus | जगभरात आतापर्यंत 48 लाख लोकांना कोरोनाची बाधा, तर तीन लाखांहून अधिक मृत्यू
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,591,953 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 94,992 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 35,704 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 248,293 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,888 लोकांचा मृत्यू झालाय. 279,524 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,330 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 227,364 इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!