नागरिकांनी अडचण असल्यास एसएमएस करावा-आ राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद /प्रतिनिधी
कंटेनमेंट’ एरिया मध्ये असलेल्या नागरिकांना आवाहन आहे की, त्यांना कोणती अडचण असल्यास त्या भागातील लोकप्रतिनिधी, न.प.चे मुख्याधिकारी व तहसीलदार यांना एस.एम.एस. द्वारे त्वरित माहिती कळवावी. ज्यामुळे प्रशासनाकडे त्याची नोंदही राहील व मदत करण्यास सोपे जाईल असे आ राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात तुळजापूर व उस्मानाबाद शहरातील १-१ कोरोना रुग्णाचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या शहरातील संबंधित भाग कंटेनमेंट एरिया म्हणून घोषित केला आहे. आ राणाजगजितसिंह पाटील यांनी या भागात जाऊन लोकप्रतिनिधी, अधिकारी व जनतेबरोबर चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला, अडीअडचणी समजून घेतल्या व काही सूचना केल्या. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेर गावाहून आलेले विशेषतः मुंबई- पुण्याहून येणारे आपले बांधव-भगिनी Covid-19 पॉझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना पॉझिटिव्हची अधिकांश प्रकरणे बाहेर गावाहून आलेल्या लोकांचीच समोर आली आहेत. त्यांना स्वगावी येण्यापासून रोखणे योग्य नाही. परंतु त्यांच्याकडून प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे आहे. आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करून घेणे व ते कॉरंटाईनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत याकडे आपण लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू होवून आता दोन महिने होत आले आहेत. अत्यावश्यक आणि गरजेची अनेक कामे आपल्याला करावीच लागणार आहेत आणि ती करण्यावाचून आता दुसरा पर्यायही नाही. आता आपल्या हातात एकच गोष्ट शिल्लक आहे ती म्हणजे काळजी घेणे- स्वतःची, कुटुंबाची व इतरांची. फेस मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन आपल्याला करावेच लागेल.असे आवाहन आ पाटील यांनी यावेळी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!