राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार
मुंबई : कोरोना महामारी आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहे. याबाबतची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.५० टक्के उपस्थितीसह राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार, विद्यार्थ्यांना ऑनलाईन-ऑफलाईन पर्याय खुले असल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालयात पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू केले जातील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याची सूटही देण्यात आली आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती अनिर्वाय असणे गरजेचे असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही अट शिथील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.