बीड

कोरोना अपडेट :बीड जिल्ह्यात आज 29 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 3 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 740 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 29 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 711 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 2 आष्टी 1 बीड 20 धारूर 1 केज 2, परळी 2 शिरूर 1

राज्यात सोमवारी 3 हजार 289 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून राज्यातील रिकव्हरी रेट 95.26 टक्के इतका झाला आहे. तसेच, राज्यात फक्त 43 हजार 701 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संखेचा आकडा खाली येत असल्याने हा राज्यासाठी मोठा दिलासा आहे.
तर 3 हजार 289 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 19 लाख 32 हजार 294 कोरोना बाधित रुग्ण घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 95.26 टक्के इतका झाला आहे. तर आज 1 हजार 948 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 20 लाख 28 हजार 347 इतकी झाली आहे.राज्यात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण कोरोनामृतांची संख्या 51 हजार 109 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात भारतात 8,635 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 94 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 13,423 नवे नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे 1,07,66,245 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 1,63,353 झाली आहे. एकूण 1,04,48,406 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,54,486 पोहचला आहे. आतापर्यंत देशात 39,50,156 नागरिकांचे लसीकरण झाले.ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.