बीडकरांना आज पुन्हा एक धक्का आज आठ जण निघाले पॉझिटिव्ह

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे गेवराई माजलगाव व आष्टी नंतर आता बीड शहरात व केज तालुक्यात कोरोना ग्रस्त आढळून आले आहेत,बीड शहरातील सावतामाळी चौक व मोमीनपूर परिसरात आजचे रुग्ण आढळले आहेत हे सर्वजण बाहेर गावातून आलेले आहेत
आज मंगळवारी पाठवण्यात आलेल्या 66 नमुन्यांपैकी 55 नमुने निगेटिव्ह आले असून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत बीडकरांना हा पुन्हा एक धक्का असून बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे बीड जिल्ह्यात सुरुवातीला एकच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता त्यानंतर बीड जिल्ह्याची ग्रीन झोन कडे नोंद होऊ लागली होती मात्र सोमवारी माजलगाव तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यानंतर पाटण सांगवी या ठिकाणी सहा रुग्ण आढळून आले या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असताना काल सहा रुग्णांना पुणे येथे हलवण्यात आले होते आजच्या आठ पॉझिटिव रुग्णांचा आता बीड जिल्ह्याची रुग्ण संख्या 20 झाली आहे त्यात एकाचा मृत्यू झाला आहे
बीड जिल्ह्यात आज मंगळवारी 66 जणांचे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते रात्री उशिरा पर्यंत याचे अहवाल प्राप्त झाले नव्हते मात्र आत्ता आलेल्या माहितीनुसार 66 जणांपैकी 55 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून यामध्ये तीन जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत तर आठ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या वीस झाली आहे

आज आढळून आलेले रुग्ण पुढील प्रमाणे
१ ) इटकूर येथील कोरोनाग्रस्त मुलीची आई – वय 35
2) चंदनसावरगाव ता केज – वय 23 मुंबईहून आला
3) काळेगाव ता केज – वय 29 मुंबईहून आला
4) ठाणे येथून आलेले दोघे – वय 22 व 44 (मोमीनपुरा, बीड)
5) ठाणे येथून आलेले – वय 16, 14 व 36 (रा सावतामाळी चौक, बीड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!