गेवराईबीड

गंगावाडी येथील पुलावर अज्ञात वाळूच्या हायवाने शेतकऱ्यास चिरडले:ठिया आंदोलन सुरू

गेवराई-सकाळी शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना गंगावाडी येथील पुलावर एका अज्ञात वाळूच्या हायवाने रुस्तुम मते यांना चिरडले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू होऊन त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

ही घटना सोमवारी सकाळी 6.30च्या दरम्यान घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आणि गावकर्‍यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते वय वर्षे (60) हे सकाळी 6.30 च्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षस भुवन येथून अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या अज्ञात हायवाने त्यांना चिरडले. यामध्ये ते जागीच ठार झाले असून त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याने पूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाला आहे.

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अवैधरित्या चालणारी वाळू उपसा तत्काळ बंद करा व दोषींवर कारवाई करा, यासाठी गावकर्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास गावकरी यांनी नकार दिला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.