सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन पद्धतीने द्या–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. २५:-महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेसाठी अधिनियमात नमूद सेवा, नमूद कालावधीत व पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने दिनांक २९ जून २०२० पासून महाऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या अधिनियमांतर्गत निर्देश दिलेे आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित महसुली सेवा त्यानुसार पदनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी यासाठी नागरिकांकडून महसुली सेवा आपले सरकार सेवा केंद्राद्वारे आज पर्यंत प्राप्त
प्रस्ताव व अर्ज दिनांक २६ जून २०२० रोजी पर्यंत निकाली काढणेची कार्यवाही पूर्ण करावी असे आदेश दिले आहेत . जिल्हाधिकारी यांनी नियंत्रक अधिकारी म्हणून या बाबतीत आढावा घेतला असता, अद्यापही बऱ्याच सेवा सेमीआॅनलाइन व आॅनलाइन ( Semi Online / Offline) पद्धतीने देण्यात येत आहेत.
यामुळे अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे नमूद केले आहे दिनांक २९.जून .२०२० पासून वरीलपैकी कोणतीही सेवा सेमीआॅनलाइन व आॅनलाइन पद्धतीने देण्यात आली तर सदर प्रमाणपत्र अवैध समजण्यात येईल. तसेच संबंधितांचेवर बोगस कागदपत्रे तयार केल्यामुळे कार्यवाही केली जाईल. या अधिनियमातंर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सर्व महसुली सेवा विहित करण्यात आलेल्या कालावधीव पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने महाऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात व वरील सर्व प्रमाणपत्रे
केवल डिजिटल साइन करून (Digitally signed ) करण्यात यावे असे सूचित केले आहे महाऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार्‍या सेवांची यादी, त्या देणारे अधिकारी आणि कालावधी सोबत प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!