बीड जिल्ह्याचा कोरोना मुक्तीचा दर वाढला:आज 32 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात काल 24 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत16 हजार 55 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. बीड जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर 95.31% टक्के झाला आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 574 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 542 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 3 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 7,आष्टी 1 बीड 18, गेवराई 1 केज 1 माजलगाव 3,परळी 1, रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

राज्यातली एकूण रुग्णसंख्या 19 लाख 35,636 झाली आहे. सध्या राज्यात 52.0 84 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, 49 हजार 580 झाली आहे. राज्यातला मृत्यू दर 2.56 शतांश टक्के इतका कायम आहे.


error: Content is protected !!