सर्वात महत्वाची बातमी:देशात ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सीन’ या दोन लसीला DCGIने दिली मान्यता

नवी दिल्ली । नववर्षाची सुरूवात एका आनंदाच्या बातमीने झाली आहे. नववर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी कोरोना लसीबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने स्वदेशी कोरोना लसीला आपातकालीन परिस्थितीत वापरण्याची मंजूरी दिली आहे. कोरोना लसीच्या शेवटच्या मंजुरीसाठी सगळ्या नजरा आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडे लागल्या होत्या.

आज DCGI सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन कोरोना लसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशात ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सीन’ या दोन लसीला DCGIने मान्यता दिली आहे. दरम्यान, देशभरात शनिवारी कोरोना लसीची ड्राय रन घेण्यात आली असून, आता लवकरच लसीकरणाची सुरूवात होणार आहे.


error: Content is protected !!