ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

सावधान:व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक:येणाऱ्या लिंकला क्लिक करू नका;सायबर पोलीस

देशातील करोनामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता अनलॉकनंतर अनेकजण नोकरी शोधण्यासाठी शहरांकडे वळू लागले आहेत. मात्र याच बेरोजगारीच्या संकटाचा फायदा घेऊन काही जण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती चोरुन त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावरील अफवांचे प्रमाणही वाढलं आहे. पोलिसांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत आणि नोकरीपासून ते घर बसल्या पैसे कमवण्याच्या जाहिरातींपर्यंत अनेक विषयांसदर्भातील अफवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहे.

अशीच एक अफवा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे घरबसल्या मोबाईलचा वापर करुन दिवसाला काही हजार कमवा. मात्र अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

काय आहे हा मेसेज

या मेसेजमध्ये एक पार्ट टाइम नोकरी करण्याची संधी चालून आली आहे असा दावा करण्यात आलाय. या माध्यमातून दिवसाला दोनशे ते तीन हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. दिवसातून केवळ १० ते ३० मिनिटं काम करावं लागेल. खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवा. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असं सांगून खाली एक लिंक दिलेली असते.