बीड

बीड शहरात आणखी एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू


बीड
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच गेल्या दोन दिवसातच कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आज सकाळी किल्ला मैदान परिसरातील एका 75 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आतापर्यंत बीड जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झालेला आहे
बीड जिल्ह्यात कोरोणाने आता आपले पाय घट्ट रोवायला सुरुवात केली आहे बीड शहरात विविध भागात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले आहेत बीड शहरातील किल्ला मैदान भागात एका 75 वर्षीय महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृती खालावल्यामुळे आज पहाटे या महिलेचा मृत्यू झाला झाला आहे बीड जिल्ह्यात हा अकरावा बळीअसून आज 973 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्या अहवालाचीही आता बीड जिल्ह्याला प्रतीक्षा आहे सर्वाधिक अहवाल हे परळी येथील आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *