पेन्शनधारकांना मोठा दिलासा! हयातनामा दाखल करण्यास मुदतवाढ:पहा शेवटची तारीख

नवी दिल्ली – देशभरात पसरलेल्या महासाथीच्या परिस्थितीत केंद्र सरकारने पुन्हा एकदा पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी याची घोषणा केली. कार्मिक राज्यमंत्री म्हणाले, “पेन्शन जमा करणाऱ्या बँकांमध्ये गर्दी टाळणे आणि साथीच्या आजाराचा धोका यासह सर्व संवेदनशील बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.”

एक कोटी पेंशनधारकांना मिळेल थेट लाभ –
संस्थेच्या या निर्णयाचा थेट लाभ ईपीएफओशी संबंधित 35 लाख पेन्शनधारकांना आणि केंद्राशी संबंधित 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, 30 नोव्हेंबरपर्यंत ज्या पेंशनधारकांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना फेब्रुवारीपर्यंत दरमहा पेन्शन मिळेल आणि ते 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठीचे पर्याच –
पेंशनधारकांच्या सोयीसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे अनेक पर्याय आहेत. पेंशनधारक देशभरातील 3.65 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), पेन्शन वितरण बँकांच्या शाखांमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. या व्यतिरिक्त 1.36 लाख टपाल कार्यालये, टपाल नेटवर्कचे 1.90 लाख पोस्टमेन आणि ग्रामीण डाक सेवकांची देखील मदत घेता येते.

अपॉईंटमेंट घेऊनही जमा करू शकता जीवन प्रमाणपत्र –
पेन्शनधारक गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन अपाॅइंटमेंट देखील घेऊ शकतात. यासाठी निवृत्तीवेतनधारक जवळच्या सामान्य सेवा केंद्रांसाठी https://locator.csccloud.in/ हा दुवा वापरू शकतात. तसेच, या लिंकद्वारे http://ccc.cept.gov.in/covid/request.aspx, आपण घराच्या आसपास असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज करू शकता.


error: Content is protected !!