बीड

दुःखद वार्ता:प्रेसफोटोग्राफर महेश जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे सदस्य तथा प्रेस फोटोग्राफर महेश अनंतराव जोशी वय 41 वर्ष यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी एक मुलगी आहे.


महेश जोशी यांच्या पार्थिवावर आज दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अमरधाम स्मशानभूमी, नविन मोंढा रोड, बीड या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

गेल्या 20 वर्षांपासून महेश प्रेस फोटो ग्राफर म्हणून काम करत होता अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा महेश कुठेही भेटला तर आदराने बोलत असायचा मीडिया क्षेत्रात प्रत्येक कार्यालयात त्याचे जवळचे सम्बध होते अचूक आणि वेधक फोटो ग्राफी करत असताना त्याने प्रश्न आपल्या फोटोग्राफी मधून टिपले होते अत्यंत कुटुंब वत्सल असणारा महेश आज हे क्षेत्र सोडून गेल्याचे दुःख पत्रकारीता क्षेत्रात व्यक्त केले जात आहे