गुडन्यूज:या देशात सुरू झाले कोरोना लसीकरण:सर्वात पहिली लस लंडनमध्ये

नवी दिल्ली । भारतासह जगभरात कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे. अशातच कोरोनाची लस कधी येणार यावर सर्व जगाचे लक्ष लागले आहे. अनेक कंपन्यांनी लस 100 टक्के कोरोनाला हरवण्यासाठी प्रभावीशाली असल्याचं म्हटलं आहे. त्यातच आजपासून लंडनमध्ये फायझरची लस देण्यास सुरूवात होणार आहे. जगात फायझरची सर्वात प्रथम कोरोना लस भारतवंशाला हरि शुक्ला यांना देण्यात येणार आहे.

हरि शुक्ला यांनी सांगितले आहे की, ‘मला आनंद होत आहे की, आपण जगावर आलेल्या महामारीविरोधात लढत आहोत.’ हरि शुक्ला यांनी सर्वात अगोदर लस घेण्याची तयारी दर्शविल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी त्यांचे स्वागत केले आहे.


error: Content is protected !!