ऑनलाइन वृत्तसेवानवी दिल्ली

हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही:8 डिसेंबरपासून नियम लागू

देशात बर्‍याच काळापासून हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचा नियम आहे. मात्र असं असलं तरी अनेक लोक याकडे दुर्लक्षित करताना दिसतात. हेच लक्षात घेऊन आता यासंबंधित कठोर नियम करण्यात आले आहे. कोलकातात आता हेल्मेटशिवाय पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनी सांगितलं की, हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचा नियम पुन्हा लागू करण्यात आला आहे.

अपघातांमध्ये घट होईल

ही मोहीम लोकांमध्ये हेल्मेट विषय जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातल्यास अपघातांमध्येही घट होऊ शकते, असं कोलकाता पोलिसांचे म्हणणे आहे.


8 डिसेंबरपासून नियम लागू

या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीकडून अनेक कायदे तयार केले गेले असले तरी हेल्मेटविना दुचाकी चालविण्यावरून नेहमीच अपघात होण्याची शक्यता असते. दुचाकी चालवताना रस्त्यांची चांगली शिस्त सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना प्रतिबंधित करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’, नियम 8 डिसेंबरपासून लागू होणार असल्याचं कोलकाता पोलिसांनी सांगितलं आहे.