बीड जिल्ह्यात आज फक्त 46 कोरोना पॉझिटिव्ह तर 48 कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 772 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 46 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 726 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 6 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 8,आष्टी 11,बीड 13,धारूर 1 ,गेवराई 2,केज 1 माजलगाव 3 परळी 3,शिरूर 4, वडवणी 1 रूग्ण सापडले आहेत.

कालपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधीत आकडा 15864 असून 14902 जण कोरोनामुक्त झाले आहेत काल 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या 455 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यत 496 जणांचा मृत्यू झाला आहे आज शिक्षक पॉझिटिव्ह संख्येत वाढ झाली आहे


error: Content is protected !!