बीड जिल्ह्यात आज फक्त 28 कोरोना पॉझिटिव्ह तर 63 कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 821 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 793 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 5 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 7,बीड 8,धारूर 1 ,गेवराई 1,केज 4 माजलगाव 4 परळी 2 वडवणी 1 रूग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधीत आकडा 15836असून 14858 जण कोरोनामुक्त झाले आहेत काल 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या 496 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यत 497 जणांचा मृत्यू झाला आहे


error: Content is protected !!