मधात मिसळला जातोय साखरेचा पाक:बडय़ा कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक

खोकला, सर्दीसह अनेक आजारांमध्ये मध गुणकारी आहे. कोरोनाकाळात नागरिकांकडून मधाची मागणी वाढली; अनेक बडय़ा कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकला जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एनवायरमेंट (सीएसई) केलेल्या तपासात ही फसवणूक उघड झाली. सीएसईने 13 कंपन्यांच्या मधाचे नमुने तपासले. या कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचे स्पष्ट झाले. मधाच्या गुणवत्तेसाठी 22 मापदंड आहेत. यातील काही कंपन्या तर केवळ पाच मापदंड पूर्ण करू शकल्या.

मधामध्ये साखर मिसळली जात असल्याचे समोर आले आहे.
सीएसईने केलेल्या तपासात अनेक बड्या कंपन्यांच्या मधात साखरेची भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे.

चाचणीवर प्रश्नचिन्ह

पतंजली, डाबर कंपनीने या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आम्ही शंभर टक्के नैसर्गिक मध तयार करतो. त्यामुळे आमचा मध शुद्ध आहे. आमच्या कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असे पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे.


error: Content is protected !!