भाजपला जोरदार धक्का:नागपूर-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पाचही फेऱ्यांत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे.

दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात (Pune graduate constituency election) महाविकास आघाडीचे अरुण लाड (Arun Lad) यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. अधिकृत निकाल येण्याआधीच मतमोजणी केंद्राबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.


error: Content is protected !!