सावधान:कोरोनाची दुसरी लाट येऊ न देणे आता जनतेच्या हातात:निष्काळजीपणा भोवणार!

डिसेंबर ते जानेवारीत करोनाची दुसरी लाट?वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली मते

दिवाळीमध्ये नागरिकांनी बाजारपेठांमध्ये केलेली गर्दी, करोना संरक्षक नियम तुडवून बिंधास्तपणे बाहेर फिरणे याचे परिणाम पुढील आठ ते दहा दिवसांत दिसतील. त्यामुळे काही तज्ज्ञांनी डिसेंबरच्या सुरवातीपासूनच हा संसर्ग वाढण्याची भीती दर्शविली आहे. तर काही तज्ज्ञांनी 25 डिसेंबर ते 26 जानेवारीदरम्यान करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. थंडीमुळे सर्दी, ताप, खोकल्याचे आजार वाढले असून नागरिक घरच्याघरी उपचार करत असल्याचे दिसून येते. दरम्यान, राज्य शासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेचा निश्चित फायदा झाला. आता गरज आहे ती नियमांचे पालन करण्याची.

करोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या संसर्गाची लक्षणे वेळोवेळी बदलत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत या विषाणूचे स्वरूप वेगळे असू शकते. त्यामुळे नागरिकांनी या आजाराबाबत बेफिकिर राहू नये. अन्यथा दुसऱ्या लाटेला सामोरे जायला अवघड होईल.

अनलॉकनंतर दिवाळीमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून वारंवार नागरिकांना सुरक्षिततेबाबत आवाहन केले जात होते. मात्र, नागरिकांनी तेवढ्या गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत रुग्णसंख्या कशी वाढते, त्यावर दुसऱ्या लाटेची दाहता समजेल. दुसरी लाट येऊ न देणे जनतेच्या हातात आहे. लक्षणे दिसतातच तत्काळ उपचार करून घ्यावे. प्रशासनाने सर्व शक्यता लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही. शहरातील वाढत्या गर्दीमुळे आता नमुने तपासणी संख्येत वाढत झाली आहे. मात्र, सध्या तरी बाधित सापडण्याचे प्रमाण वाढलेले नाही. दुसरी लाट कधी येईल हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सांगता येईल. दिवाळी संपली, आता तरी नागरिकांनी स्वत: आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी करोना संरक्षक नियमांचे पालन करावे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. लक्षणे दिसल्यास अंगावर दुखण न काढता तपासणी करून घ्यावी.असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे


error: Content is protected !!