महाराष्ट्रमुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साधेपणाने साजरा करा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साधेपणाने साजरा करणार असल्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन हा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे. प्रत्येक वर्षा स्मृतिदिनी शिवाजी पार्कात मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पण यंदा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम होणार नाही अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

मंगळवारी 17 तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे.
पण यंदा राज्यावर कोरोनाचा संकट आहे. त्यामुळे सगळे सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. याचमुळे बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

शिवसेना भवनात अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांची मंगळवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबईतील विभाग प्रमुखांना यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन दिनांक 17/11/2020 असून कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंब हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. पण विभागातील शिवसैनिकांनी आणि विभागप्रमुख यांनी शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी जमू नये असा आदेश देण्यात आला आहे.