बीडजवळील घटना:प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

बीड, 15 नोव्हेंबर : पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच 22 वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची हृदयद्रावक घटना बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती.

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील एक ( वय 22) पीडित तरूणी आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.
दरम्यान, पहाटे 3 वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या कडेला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के टक्के शरीर भाजले असून प्रकृती स्थिर आहे.

काही वेळानंतर रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दुर्दैवी म्हणजे पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत तडफडत होती. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून नेकनूर पोलीस स्टेशन के ए.पी.आय.लक्ष्मण केंद्रे पुढील तपास घेत आहेत. मात्र, ऐन दिवाळीला लक्ष्मीपूजनात्या दिवशी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे माणुसकी जिवंत आहे का? प्रश्न निर्माण होतो.


error: Content is protected !!