भाविकांसाठी मंदिर प्रवेशाची अशी असेल नियमावली
प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर आणि टेंपरेचर चेकिंगची व्यवस्था असावी.
ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल.
मंदिराच्या आवारात कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना, तसेच घ्यावयाची काळजी यांची माहिती देणारे फलक तसेच ध्वनिक्षेपण असावे
गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या आकारमानानुसार भाविकांना गटागटाने दर्शनासाठी सोडले जावे.
मूर्तीला तसेच तेथील पुतळे आणि पोथ्यांना स्पर्श करण्याची परवानगी नाही.
प्रसाद वा तीर्थ वाटप करू नये.
मंदिराच्या आवारात अन्नदान, भंडारा असेल, तर तेथे योग्य त्या खबरदारीच्या योजना आखणे बंधनकारक असेल.