वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशाची पहिली यादी जाहीर

एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 50 हजार 869 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याप्रमाणे या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी राज्य सीईटी सेलने शुक्रवारी सकाळी जाहीर केले.
राज्य सीईटी सेलने एमबीबीए आणि बीडीएस प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दि.12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 50 हजार 969 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच एकूण 41 हजार 752 विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी राज्य सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली.
दरम्यान, दि.6 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत केवळ एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी कॉलेजांचे पर्याय भरण्याचे सूचित केले होते. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता शुक्रवारी जाहीर झाली. त्यानंतर प्रवेशाची पहिली निवड यादी दि.15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे.
या निवड यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना दि.20 नोव्हेंबरपर्यत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


error: Content is protected !!