भाजप-शिवसेना ब्राह्मण समाजाला गृहीत धरतो; तर राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्ष दुर्लक्ष करतात-कोल्हापुरात गोलमेज परिषद

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद आयोजीत आणि ब्रह्म महाशिखर परिषद (राज्यस्तरीय समिती) यांची ब्राह्मण समाजाची गोलमेज परिषद रविवारी (ता. 8) होत आहे. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये परिषद होत असून महाराष्ट्रातील ब्रह्मवृंद उपस्थित राहतील, अशी माहिती अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात गोलमेज परिषद भरवली असून 22 जानेवारी 2019 ला आझाद मैदान (मुंबई) येथे आंदोलन झाले होते. भाजप सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. 22 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. नंतर 22/23 फेब्रुवारीला कोल्हापुरात सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ब्राह्मण अधिवेशन पार पडले.
सर्व नेत्यांनी ब्राह्मण समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते.

यावेळी कुलकर्णी म्हणाले, “भाजप, शिवसेना ब्राह्मण समाजाला गृहीत धरतो; तर राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्ष हे आम्ही मतदार आहोत, असे समजून दुर्लक्ष करतात. ब्राह्मण समाजाची “व्होट बॅंक’ कमी आहे असे गृहीत धरले जाते; पण प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 43 मतदार संघात ब्राह्मण समाज परिणामकारक भूमिका बजावू शकतो. ब्राह्मण समजाचे प्रलंबित प्रश्नाबाबत जो आम्हाला न्याय देईल त्याला आमचे सहकार्य राहील; पण इथून पूढे कोणत्याही पक्षाने ब्राह्मण समाजाला गृहीत अथवा ब्राह्मण समाजाला डावलण्याची भूमिका घेऊ नये. ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे.” पत्रकार परिषदेला सुरज कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, निलेश कुलकर्णी, प्रदीप अष्टेकर, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे आदी उपस्थित होते.


error: Content is protected !!