बीड

शाळा सुरू होणार:जिल्ह्यातील 18 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

बीड-जिल्ह्यातील 9 वी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या आता याचा दुसरा टप्पा सुरू झाला असून शनिवारी 882 शिक्षकांची तपासणी केली असता त्यात 18 पॉझिटिव्ह आढळले असून 152 रिपोर्ट प्रलंबित आहेत.

जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 676 शिक्षकांची अँटिजेंन टेस्ट केली गेली तर 206 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली .यामध्ये 18 शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .विशेष म्हणजे तब्बल 152 शिक्षकांच्या चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत .