बीड जिल्ह्यात आज 68 जणांना डिस्चार्ज तर 81 पॉझिटिव्हची भर

बीड जिल्ह्यात प्रमाण कमी असले तरी बाधीत रुग्ण आढळून येतच आहेत आज 81 पॉझिटिव्हची भर पडली आहे

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 558 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 81 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 477 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 6, आष्टी 19,
बीड 23, धारूर-3
गेवराई 3,केज 2, माजलगाव 6
परळी 3 , शिरूर 7, वडवणी 6 रूग्ण सापडले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 13510 जणांना बाधा झाली आहे. त्यातील 12635 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 707 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 68 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 438 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.रुग्ण बरे होण्याचा दर 91.52 % आहे
सर्वात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण परळी तालुक्यात अधिक असून केवळ 50 पेक्षा कमी रुग्ण सध्या उपचार घेत आहेत


error: Content is protected !!