मराठवाड्यात आचारसंहिता लागु;1 डिसेंबर रोजी होणार पदवीधर निवडणुक मतदान

मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी 3 डिसेंबर रोजी निवडणुक होणार असून, यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम आज 2 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला असल्याने मराठवाडाभर आचारसंहिता लागु झाली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या संदर्भात माहिती दिली.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या आमदारांची मुदत जुन महिन्यातच संपली होती, मात्र कोरोनामुळे ही निवडणुक लांबणीवर पडली होती. आज 2 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या संदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

ते म्हणाले, पदवीधर मतदार संघासाठी 5 नोव्हेंबर रोजी अधिसुचना जारी केली जाणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदत असणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार असुन, 17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

1 डिसेंबर रोजी मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मतदान घेतले जाणार आहे. यासाठी विभागात 913 मतदान केंद्र असणार आहेत. 31 डिसेंबर पर्यंत 3 लाख 47 हजार 731 मतदारांनी नोेंदणी केलेली आहे. त्यानंतर कोरोना काळात अनेक मतदारांनी ऑनलाईन नोेंदणी केलेली असल्याने यामध्ये वाढ होणार आहे. या निवडणुकीत साडेतीन लाखापेक्षा जास्त मतदार मतदान करणार आहेत.

दरम्यान, आज सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने मराठवाड्यात आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. या आचार संहितेबाबत त्यांनी मार्गदर्शक सुचनांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


error: Content is protected !!