राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी मुख्यमंत्री आज राज्यपालांना सोपवणार!नावाबाबत प्रचंड गुप्तता

मुंबई : विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी आज (2 नोव्हेंबर ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहे. राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे
आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी व न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरुन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सर्व निकषात ही नावं बसावीत
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी निवडण्यात आलेल्या नावाबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे ही नावे केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाध्यक्ष खा शरद पवार यांच्याशिवाय कुणालाही माहीत नाहीत ज्या नावांची चर्चा सुरू आहे ती बाहेरची चर्चा आहे आता कुणाची वर्णी लागणार याकडे सम्पूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे,तिन्ही पक्षातून प्रत्येक विभागाला एक सदस्य मिळणार आहे मराठवाड्यातून जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांची वर्णी लागणार हे मात्र निश्चित मानले जात आहे


error: Content is protected !!