वर्क फ्रॉम होम:सरकारने घेतला मोठा निर्णय; या तारखेपर्यंत करावे लागणार काम!

नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना वर्क फ्रॉम होमद्वारे काम करावे लागले. गेल्या चार महिन्यांपासून अनेक जण घरातून काम करत आहेत. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी करोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता अनेक कंपन्यांनी खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. अशाच सरकारने वर्क फ्रॉम होम बाबत एक मोठा निर्णय घेतलाय.
टेलीकॉम विभागाने आयटी आणि आयटीइएस क्षेत्राला या वर्षी डिसेंबरपर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली. याआधी ही मुदत जुलै महिन्यापर्यंत होती आती ती डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
टेलीकॉम विभागाने करोनाची परिस्थीत लक्षात घेऊन वर्क फ्रॉम होमची सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी आनंद व्यक्त केलाय. विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी यांनी ट्विट करून सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. सरकारने दिलेल्या या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. सरकारने काम करण्याच्या नव्या पद्धतीला पाठिंबा दिला आहे. यामुळे कामातील गुणवत्ता आणि त्याचे सातत्य वाढवण्यात मदत मिळेल.
आयटी क्षेत्राने सरकारकडे मागणी केली आहे की कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी घरातून काम करण्याची परवानगी दिली जावी. जेणेकरून कर्मचारी क्षमतेचा पूर्ण वापर केला जाईल. तसेच रिमोट वर्किंग आणि ऑफिस वर्किंग याचे प्रमाण समान ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
रविशंकर प्रसाद, टेलीकॉम मंत्रालयाचे सचिव यांचे आयटी क्षेत्राकडून धन्यवाद. यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राहिल, असे नॅसकॉमचे अध्यक्ष देवयानी घोष म्हणाले. करोना व्हायरस रोखण्यासाठी तसेच त्याच्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाल्यापासून देशातील ४३ लाख आयटी कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के घरातून काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!