नवीन वाहनांसाठी व्हीआयपी अथवा पसंतीचा नंबर मिळणार:करा नोंदणी अर्ज

बीड,दि. 29 :- (जि.मा.का) उप प्रादेशिक परिवहन कार्यालयत परिवहनेतर संवर्गातील चारचाकी वाहनांची नवीन MH23BC 0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पंसतीचा नोंदणी क्रंमाक हवा असेल त्यांनी या कार्यालयात दि. 2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावेत.

पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रंमाकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काची डी.डी (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड यांचे नावे) तसेच ओळखपत्र व मोबाईल क्रमांक कार्यालयात सादर करावेत. विहीत शुल्काच्या रक्कमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करुन द्यावेत. अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. नविन मालिका दि. 2 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यात येईल. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास पुढील पध्दतीने अर्ज स्विकारले जातील.

प्राप्त होणारे अर्ज दुपारी 2.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील व दि. 2 नोव्हेंबर 2020 रोजी अर्जाची छाणनी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास दि. 2 नोव्हेंबर 2020 दुपारी 2.00 वाजता कार्यालयात एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत चौकशी करावी. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 3 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत वाढीव शुल्काच्या धनाकर्ष (डी.डी.) स्वतंत्र्य बंद लिफाफ्यातुन सादर करणे बंधनकारक राहील. दुपारी 3.00 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रक्कमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील असे विजय काठोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड (अ.का) यांनी कळविले आहे.


error: Content is protected !!