पॉलिटेक्‍निक प्रवेश अर्जास पुन्हा मुदतवाढ:3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार

पुणे – पॉलिटेक्‍निक प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

त्याचप्रमाणे बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. दि. 10 ऑगस्टपासून सुरू असलेल्या प्रक्रियेत नऊवेळा मुदतवाढ देण्याची वेळ तंत्रशिक्षण संचालनालयावर आली आहे.

नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जासह कागदपत्र तपासणी, अर्जनिश्‍चिती 3 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागेल. तात्पुरती गुणवत्ता यादी 6 नोव्हेंबरला जाहीर होणार असून, त्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी 7 ते 9 नोव्हेंबर अशी मुदत दिली आहे.
त्यानंतर 11 नोव्हेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. याबाबतची अधिक माहिती तंत्रशिक्षण संचालनालयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


error: Content is protected !!