पुढील चार दिवसात राज्यात अतिवृष्टीची शक्यता:हवामान खात्याचा इशारा

पुढचे 72तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, उद्यापासून चार दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्या सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत असून त्यामुळे पुढील आठवड्यात देखील राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


error: Content is protected !!