जगभरात 44 लाख करोना बाधीत;साडे सोळा लाख रुग्ण झाले बरे

भारतात कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी

मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 44 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या दोन लाख 97 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 88,202 नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून 24 तासात 5314 लोकांचा मृत्यू झाला आहे.  वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 97 हजार 765 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाख 57 हजार 716 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!