कोविड-19 मुळे मृत्यू कसा होतो,काय आहेत कारणे

बीजिंग/वृत्तसेवा

कोविड-19 ची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्या बहुतेक रुग्णांचा मृत्यू रोगप्रतिकारक शक्‍तीच्या “ओव्हर रिऍक्‍शन’मुळे झाला आहे, असे या संदर्भात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना लक्षात आले आहे. फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासामध्ये हा विषाणू वायू मार्गाने कसा संक्रमित होतो, पेशींच्या आत त्याची वाढ कशी झपाट्याने होते आणि “सायटोकाईन स्टॉर्म’ झाल्याने रोगप्रतिकारक शक्‍तीचा ऱ्हास कसा होतो, हे संशोधकांनी टप्प्याटप्प्याने समजावून सांगितले आहे.

हे “सायटोकाईन स्टॉर्म’ रक्तातील पांढऱ्या पेशी प्रमाणापेक्षा अधिक उद्दिपित झाल्याने होते. पांढऱ्या पेशींमधून रक्‍तामध्ये मोठ्या प्रमाणावर “सायटोकाईन’ स्रवत असते. “सार्स’ आणि “मर्स’ यासारख्या विषाणूंच्या प्रादुर्भावाप्रमाणेच कोविड-19 च्या संसर्गादरम्यान “सायटोकाईन स्टॉर्म सिंड्रोम’ विकसित होतो. या सायटोकाईनमुळे लिंफोसाईट आणि न्यूट्रोफिल्स (पांढऱ्या पेशींचे प्रकार) मोठ्या संख्येने आकर्षित होतात. या पेशी फुफुसांमध्ये जमा झाल्यामुळे पुढील अनर्थ घडतो, असे या शोधनिबंधाचे लेखक आणि चीनमधील झुन्या मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, डायशुन लिऊ यांनी म्हटले आहे.
सायटोकाईनच्या अतिरिक्‍त माऱ्यामुळेच रुग्णाला ताप, रक्‍तवाहिन्या फुटणे आणि शरीरांतर्गत रक्‍ताच्या गुठळ्या होतात. यामुळे रक्‍तदाब अतिशय कमी होतो. रक्‍तातील ऑक्‍सिजन आणि आम्ल खूप कमी होते. तर फुफुसांमध्ये पाणी जमा होते.चुकीच्या दिशादर्शनामुळे पांढऱ्या पेशी निरोगी अवयवांवरही हल्ला होतो. यामुळे फुफ्फुस, हृदय, यकृत, आतडे, मूत्रपिंड आणि गुप्तांग निकामी ठरतात, असेही या शोधनिबंधात म्हटले आहे. एकापाठोपाठ एक अवयव निकामी झाल्यामुळे फुफुसे निकामी होतात. मृतपेशी फुफुसांमध्येच अडकून राहिल्यामुळे ऑक्‍सिजन शोषून घेण्याची प्रक्रिया मंद होत जाते. त्यामुळेच आतापर्यंत झालेले बहुतेक मृत्यू श्‍वसन यंत्रणा निकामी झाल्यामुळे झाले आहेत, असेही या संशोधकांनी म्हटले आहे.कोविड-19 वरील प्रभावी औषधाच्या अभावामुळे सध्या तरी उपचारादरम्यान रोगाची लक्षणेच मर्यादित करण्यावर भर दिला जायला हवा. त्यामुळेच मृत्यूदर मर्यादित ठेवण्यास मदत होईल अएही संशोधकांनी म्हटले आहे. त्यासाठी रक्‍तशुद्धीकरणासाठी कृत्रिम पद्धतीचा अवलंब करण्याचा पर्याय स्वीकारावा, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!