द्विगुणा आनंद!!!एका बहिणीला 4 वर्षांनंतर एक नव्हे तर दोन भाऊ मिळाल्याचा आनंद!

बीड दि.18 (प्रतिनिधी)
एका बहिणीला 4 वर्षांनंतर एक नव्हे तर दोन भाऊ मिळाल्याचा आनंद ! द्विगुणा आनंद याचा की एका जोडप्यास लग्नाच्या बारा वर्षानंतर दोन मुले झाल्याचा!!!

काही वर्षांपूर्वी एक जोडपे संतती होत नाहीये म्हणून खूप व्याकुळ झालेल्या मनस्थितीत आले होते. तेव्हा शहरातील के.एस.के. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सारिका क्षीरसागर यांनी त्या जोडप्यास सविस्तर असे मार्गदर्शन करून धीर दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यामुळे लग्नाच्या तब्बल 12 वर्षांनंतर IVF ने त्यांना मुलीच्या स्वरूपात संतती झाली. तेव्हा त्यांना झालेला आनंद शब्दात मांडणे कठीण आहे. आज पुन्हा त्यांना 4 वर्षानंतर दोन मुलांच्या स्वरूपात झालेली संतान यामुळे रुग्णाच्या पाल्याचा व नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.


आता दिवाळीमध्ये एका बहिणीची भाऊबीज अधिक गोड होणार आहे. रुग्णाच्या परिवाराने डॉ.सारिका क्षीरसागर व संपूर्ण के.एस.के. हॉस्पिटलचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.


error: Content is protected !!