बीडमध्ये शनिवारी मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीर

बीड दि.16 (प्रतिनिधी): येथील नगरनाका नाट्यगृह रोडवर शिवसंग्राम कार्यालयाच्या बाजुला सुरू असलेल्या विघ्नहर्ता स्वस्त औषधी सेवा दुकानाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विघ्नहर्ता औषधी सेवा व जनसेवा क्लिनिकल लॅबोरटरीच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजी मोफत रक्तदाब आणि शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या शुभहस्ते होणार आहे.
केंद्र शासनाच्या जन औषधी योजनेवर आधारीत सदर स्वस्त औषधी सेवा सुरू करण्यात आलेली आहे. विविध आजारावर असलेल्या औषधी या 30 ते 70 टक्के स्वस्त आहेत. सदर दुकानाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिरामध्ये आलेल्या रूग्णांना आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. यावर बी.पी. आणि शुगरची नोंद ठेवण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी 9.00 वाजता या शिबिराचा शुभारंभ होणार आहे. तर रूग्णांना सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत तपासणी केली जाणार आहे. कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर, शॅनिटायरचा वापर आदी नियमाचे पालन करून रूग्ण तपासणी केली जाणार आहे. सदर मोफत शिबिराचा लाभ बीड शहरातील नागरिकांनी आणि रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


error: Content is protected !!