जिल्हाभरात पावसाचा हाहाकार:बीड जिल्ह्यातील मोठी धरणेओव्हफ्लो,पिकांची नासाडी

गेल्या पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. यावेळी ग्रामीण भागांसह शहरी भागातही पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागांत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. तर काही भागांत वीजपुरवठाही बंद आहे. काही भागांत साचलेलं पाणी घरांत जाऊन पोहोचलं आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कालपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून कापूस तूर सोयाबीन हे तीनही पिके अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली असतानाच वाया गेली आहेत कापसाच्या पहिल्या वेचणीला सुरुवात झाली होती आता मात्र पुढील वेचणी होईल की नाही याची शाश्वती नाही तुरीला आलेला फुलोरा देखील पावसामुळे झडला आहे

नद्या तलाव तुडुंब भरून वाहू लागले

गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील बहुतेक धरणं आता ओव्हर फ्लो झाली आहेत. अपवाद फक्त मांजरा धरणाचा आहे. मांजरा धरणामध्ये सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे. मात्र जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी असलेल्या माजलगाव धरण त्यानंतर बिंदुसरा धरण ओसंडून वाहताना पाहायला मिळतंय. माजलगाव धरणाचे यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा सगळे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. जायकवाडीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने जायकवाडी धरणाचे पुन्हा एकदा 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.


error: Content is protected !!