बीड जिल्ह्यातील मजुरांसाठी 30 लाखाचा निधी

मुंबई:लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यातून महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजुरांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांना ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ७० रुपयांचा निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.यामध्ये बीड जिल्ह्यातील मजुरांसाठी 30 लाखाचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे

कोविड-१९ च्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील कामगार आणि मजूर अडकले. तसेच महाराष्ट्रातील कामगार आणि स्थलांतरीत मजूरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळेल. सचिव आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभाग यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे, हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय निधी
मुंबई शहर -१२,९६,००,००० मुंबईउपनगर-१०,००,००,००० ठाणे- ४,८०,००,००० रायगड- २,५०,००,०००
रत्नागिरी- १,५०,००,००० पालघर- ३,००,००,०००
सिंधुदुर्ग – १,००,००,००० नाशिक- ४०,००,००० धुळे- २५,००,००० नंदुरबार- २५,००,००० जळगाव- २०,००,००० अहमदनगर- २०,००,०००पुणे – ८,००,००,००० सातारा- ९५,८१,२७० सांगली- ३०,००,००० सोलापूर- ५०,००,००० कोल्हापूर- १,२५,९१,४०० औरंगाबाद- ८०,००,००० जालना- ५०,००,००० बीड- ३०,००,००० परभणी- ५०,००,००० हिंगोली- ६,००,००० नांदेड- २०,००,००० उस्मानाबाद- २०,००,००० लातूर- ६०,००,००० अमरावती- ३०,००,००० अकोला- १२,७४,४०० वाशिम- १०,००,००० बुलढाणा- २०,००,०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!