जनतेला दिलासा:आता मास्क मिळणार कमी किमतीत

मुंंबई- कोरोना रोखण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर हे अत्यावश्यक सांगितले आहे. मात्र याच काळात या दोन्ही वस्तूंबाबत काळाबाजार सुरु झाला. मास्कचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचचली आहेत.

मास्कचे दर चार पटीने कमी होतील, अशी अपेक्षा आहे. मास्कचे दर नियंत्रित करण्याबाबतच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. मास्कचे दर अव्वाच्या सव्वा वाढवून नफा कमावला जात असल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

एन 95 मास्क 19 ते 50 रुपयांपर्यंत आता मिळू शकणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात मास्क विक्रीतून खासगी कंपन्यांनी भरपूर नफा कमावल्याचं उघडकीस आलंय. एन-95 मास्क, थ्री लेअर मास्क आणि सर्जिकल मास्कच्या किंमती मागणी वाढली तशा अव्वाच्या सव्वा वाढवल्या होत्या अनेकांनी कोरोनाच्या नावाखाली ग्राहकांची तर लूट केली आहे


error: Content is protected !!