कोणतेही KYC डाक्युमेंट्स नसतानाही SBI मध्ये खाते ओपन करण्याची सुविधा

नवी दिल्ली-जर आपल्याकडे कोणतेही KYC डाक्युमेंट्स नसतील ज्यामुळे आपण बँक खाते उघडू शकणार नाही तर आता चिंता करू नका. (SBI – State Bank of India) 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बेसिक सेविंग्ज डिपॉझिट स्मॉल अकाउंट (SBI Basic savings Deposit Small Account) ची सुविधा ऑफर करत आहे. ज्यामध्ये KYC डाक्युमेंट्स देण्याची चिंता राहणार नाही. SBI ची ही सुविधा जे समाजातील गरीब घटकांमधून आले आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही डाक्युमेंट्स नाही अशांसाठी खूप उपयुक्त ठरेल. अशा लोकांना कोणताही अतिरिक्त चार्ज किंवा फी न घेता बँक खात्याची सुविधा मिळते जेणेकरून ते काही बचत करू शकतील.

KYC नियमांमध्ये शिथिलता असल्यामुळे या खात्यावर बर्‍याच मर्यादा देखील आहेत, ज्याची काळजी घ्यावी लागेल.
मात्र, आपण नंतर KYC डाक्युमेंट्स सबमिट केल्यास ते नियमित बचत खात्यात (Regular Savings Account) रूपांतरित केले जाईल. चला तर मग एसबीआयच्या बेसिक सेविंग्ज डिपॉझिट स्मॉल अकाउंट बद्दल जाणून घेऊयात …

पात्रताः जर कोणतीही व्यक्ती बँक खाते उघडण्यास पात्र असेल तर SBI च्या या सुविधेचा उपयोग करुन ते आपले खाते उघडू शकतात. हे खाते पर्सनल, जॉईंट बँक अकाउंट म्हणून उघडले जाऊ शकते.

हे बँक खाते कोठे उघडे जाईलः हे बँक खाते उघडण्याचा पर्याय सर्व SBI शाखांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, SBI च्या काही स्पेशलाइज्ड ब्रांच – जैसे पसर्नल बैंकिंग ब्रांचेज(PBBs)/स्पेशल पर्सनलाइज बैंकिंग(SPB)/मिड कॉरपोरेट ग्रुप(MCG)/कॉरपोरेट अकाउंट ग्रुप (CAG) ना ही सुविधा मिळत नाही.

बॅलन्स लिमिट : SBI च्या मते या खात्यातील एकूण बॅलन्स कोणत्याही वेळी 50,000 पेक्षा जास्त नसावी. तसेच, एका महिन्यात एकूण पैसे काढण्याची किंवा ट्रांसफरची रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त नसावी. कोणत्याही एका आर्थिक वर्षात एकूण क्रेडिट रक्कम ही 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी याकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल.

कोणत्याही वेळी खात्यात एकूण बॅलन्स 50,000 पेक्षा जास्त असेल किंवा आर्थिक वर्षातील एकूण क्रेडिट 1 लाखाहून अधिक असेल तर या खात्यातून कोणत्याही व्यवहारास परवानगी दिली जाणार नाही. होय, आपण KYC डाक्युमेंट्स बँकेला उपलब्ध करुन दिल्यावरच या सेवा सुरू होईल.

पैसे काढण्याची परवानगी: या बँक खात्यातून महिन्यातून फक्त 4 वेळा पैसे काढले जाऊ शकतात. एसबीआय किंवा इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जातील. RTGS/NEFT/ क्लीयरिंग / शाखा रोख पैसे काढणे / ट्रांसफर / इंटरनेट बँकिंग डेबिट / ईएमआय इत्यादी इतर कोणत्याही मार्गांचा समावेश असेल. एका महिन्यात 4 वेळा पैसे काढल्यानंतर, नंतर पुढील पैसे काढण्यासाठी आपल्याला पुढच्या महिन्यासाठी थांबावे लागेल.


error: Content is protected !!