देशात पहिले कोरोना टेस्टिंग किट तयार
नवी दिल्ली/वृत्तसेवा
भारतातील पहिले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट पुण्यात तयार करण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांनी कोविड-19 च्या तपासणीसाठी पूर्णपणे स्वदेशी अशा एलीसा (Elisa) अँटीबॉडी टेस्ट किटची निर्मिती केली आहे. या किटमुळे कमी वेळात कोरोनाचे निदान होणार आहे.
IgG एलिसा कोविड कवच टेस्ट असे या किटला नाव देण्यात आले आहे. हे एक अँटीबॉडी टेस्ट किट आहे. मुंबईतील 2 वेगवेगळ्या परिसरांत या किट्सचा वापर करून तपासण्या करण्यात आल्या. अडीच तासांत या किट्सच्या माध्यमातून 90 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहे. त्याचे रिझल्ट योग्य आल्याने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या किट्सच्या कमर्शिअल प्रोडक्शनसाठी जायडस कॅडिलाला परवानगी दिली आहे. लवकरच हे किट देशात चाचणीसाठी उपलब्ध होणार आहे.जास्त लोकसंख्या असलेल्या वस्तीत हे किट महत्वाची भूमिका बजावणार आहे. दाट वस्तीत कोरोना रुग्ण शोधून काढणे यामुळे सोपे होईल