औरंगाबाद मध्ये कोरोना बधितांची संख्या 651

औरंगाबाद. औरंगाबादेत मंगळवारी आणखी 24 जणांचे काेराेना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 651 वर गेली आहे. तर रामनगरमधील ८० वर्षीय व पुंडलिकनगरमधील ५८ वर्षीय या दाेघांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १५ झाली. दिलासादायक बाब म्हणजे साेमवारी ४० जण काेराेनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. कोतवालपुरा, जुना बाजारसह सातारा परिसरातील सदानंदनगर या नवीन भागात रुग्ण सापडल्यामुळे हे भागही आता हाॅटस्पाॅट ठरले आहेत. दरम्यान, एकूण रुग्णांपैकी २१ टक्के म्हणजे १३१ रुग्ण रामनगर व संजयनगर या ३०० मीटरवर अंतरावरील दाेन गल्ल्यांमध्येच आढळल्याने हा भाग आता डेंजर झाेन बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!