उस्मानाबाद जिल्ह्यात आढळला कोरोणाबाधित रुग्ण
मुंबईला फळे घेऊन जानारा परंडा तालुक्यातील तरुण पॉझिटीव्ह !
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
कोरोणाच्या लढाईत महाराष्ट्रात उस्मानाबादच वेगळा पॅटर्न निर्माण झाला असताना ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंता वाढली आहे. कोरोना बाधित तरुण हा परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील असून तो नवी मंबई , पुणे मार्केटला फळविक्रीचा व्यवसाय करतो . प्रशासन खडबडून जागे झाले असुन त्याच्या कुटूंबातील चार व संपर्कात आलेल्या १६ व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे .
उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी शासनामार्फत केलेल्या उपाययोजना तसेच स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सक्षमपणे हाताळली होती. पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून जिल्हा पाच आठवड्यांपूर्वी कोरोनामुक्त झाला. विशेष म्हणजे रविवारीच जिल्हाधिकार्यांनी आकाशवाणीवरुन जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी उस्मानाबादकरांना शपथही दिली होती. तर सोमवारपासून बाजारपेठेच्या वेळेत बदल आणि जिल्हांतर्गत बससेवाही सुरू झालेली असताना कोरोनाने जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील व मंबई – पुणे मार्केटमध्ये फळविक्री करणाऱ्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर परंडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली. यामुळे प्रशासन सतर्क झाले असुन त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असुन कुटूंबातील चार व संपर्कात आलेल्या १६ नागरिकांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येत आहे..