महाराष्ट्र

शनिवार पर्यंत मान्सून अंदमानात धडकणार

पुणे (प्रतिनिधी)- उन्हाचे चटके सोसत आपण ज्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतो तो लवकरच अंदमान-निकोबार बेटांवर दाखल शक्‍यता निर्माण झाली आहे.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानूसार येत्या शनिवार पर्यत मान्सून हा या अंदमान निकोबार च्या दक्षिण बेटांवर पोहचले.

भारतीय हवामान खात्याने याबाबतचे वृत्त आज दिले आहे.बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात येत्या दोन दिवसात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.त्याची तीव्रता येत्या दोन दिवसात वाढणार आहे.त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीला चालना मिळणार असून येत्या शनिवारपर्यत बंगालच्या उपसागरात दाखल होईल असा अंदाज आहे.यापुर्वी हवामान विभागाने जाहीर केलेल्या मान्सूनच्या संभाव्य तारखांच्या नवीन वेळापत्रकानूसार मान्सून केरळ मध्ये एक जून रोजी दाखल होण्याची शक्‍यता आहे.त्याचबरोबर यंदा मान्सून जून ते सप्टेंबर या कालावधी मध्ये शंभर टक्के बरसणार आहे.त्याच पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.यंदा मान्सून जून ते सप्टेंबर या कालावधीत शंभर टक्के बरसणार आहे. असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने 15 एप्रिल रोजी जाहीर केले होते यां अंदाजात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीर धरण्यात आली आहे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या प हिल्या आठवड्यात मान्सून हंगामाचा सुधारित दिर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *