महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून धावणार लालपरी

एका एसटीमध्ये एकावेळी 22 जणांचा ग्रुप प्रवास करू शकेल

मुंबई – लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार असून ती येत्या 18 मे पर्यंतच असेल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. मात्र, कन्टेन्मेंट झोनमधून कोणालाही प्रवासाची परवानगी नसेल.

अनिल परब म्हणाले, प्रत्येकाला परवानगी घेऊनच प्रवास करायचा आहे. त्यापूर्वी त्यांची थर्मल स्क्रीनिंग, तपासणी करून परवानगी दिली जाईल. लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये किंवा रस्त्यावर गर्दी करू नये. सगळ्यांची व्यवस्था केली जाईल. व्यवस्थित माहिती घेऊन, शिस्त पाळून मूळगावी परत जा. असे आवाहनही त्यांनी केले.

ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी अन्नपाणी सोबत ठेवावे. एसटीचेच प्रसाधनगृह वापरण्यात येतील. ती स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अनिल परब म्हणाले.

एसटीने प्रवासाचे नियम…

एका एसटीमध्ये एकावेळी 22 जणांचा ग्रुप प्रवास करू शकेल.या 22 जणांच्या ग्रुप लीडरला पोलीस स्टेशन आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकारी किंवा तहसीलदाराला प्रवासाच्या परवागनीसाठी अर्ज करावा लागेल. प्रवाशांना आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र दाखवत स्वतःची ओळख द्यावी लागेल.प्रवासादरम्यान प्रवाशाला मास्क लावणे अनिवार्य असेल.एसटी बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी बसेल.पॉईंट टू पॉईंट सर्व्हिस असल्याने एसटी रस्त्यात इतर कुठेही थांबणार नाही.लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी स्वतःचे अन्न सोबत घ्यावे.प्रवाशांनी फक्त एसटी डेपो आगारातील स्वछतागृहाचा वापर करावा.कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना प्रवासाची परवागनी नाही.असे सांगण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *