बीडच्या तरुण पत्रकाराची बारामतीत उल्लेखनीय कामगिरी
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्धी प्रमुखपदी निवड
बीड जिल्ह्यातील केज शहरातील रहिवासी असलेल्या पत्रकार संतोष शिंदे याने व्यवसायानिमित्त थेट बारामती शहर गाठले त्या ठिकाणी गेल्यानंतर भावनगरी नावाच्या साप्ताहिकात पासून पत्रकारितेची सुरुवात केली त्याचबरोबर सर्वांशी मिळून मिसळून राहून सामाजिक कार्यातही सहभाग नोंदवला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जवळ जाऊन त्याने मोठी कामगिरी केली आहे या तरुणाने बारामतीत केलेल्या या कामगिरीची दखल इंडियन रिपोर्टर असोसिएशन या पत्रकार संघटनेने घेतली आणि राज्याच्या प्रसिद्धीप्रमुख पदी त्याची निवड केली त्याबद्दल बीड जिल्ह्यात नाही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे
बारामती येथील सामाजिक क्षेत्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे संतोष नारायण शिंदे यांची नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्धी प्रमुख (मीडिया प्रभारी) पदी निवड करण्यात आली आहे.
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यतेने काम करणारी, संपूर्ण भारतातील सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी संतोष शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याबाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले.
संतोष शिंदे हे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून समाजातल्या विविध घटकांना मदत करत न्याय मिळवून देण्याचे महत्कार्य त्यांनी सुरू केले आहे. त्याला आपल्या साप्ताहिक भाव नगरीच्या माध्यमातून व्याप्त स्वरूप त्यांनी प्राप्त केले आहे. समाजातल्या अनिष्ट बाबींवर प्रकाश झोत टाकण्या बरोबरच गोरगरीब आणि दीन दुबळ्या नागरिकांना विविध स्तरावर मदत करत न्याय मिळवून देण्याचे काम ते करत आहेत
साहजिकच त्यांचा समाजातील वावर आणि लोक संग्रह मोठा आहे. उमदा स्वभाव आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्येची उकल करण्याची त्यांची प्रचंड तळमळ यामुळेच ते शक्य झाले आहे. आपल्या कार्याला पत्रकारितेची जोड देऊन संतोष शिंदे यांनी युवा पिढी पुढे केवळ आदर्शच ठेवला नसून त्यांना आपलंसं करत, त्यांना एक आशेचा किरण दाखवला आहे.
म्हणूनच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्धी प्रमुख पदावर निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.