राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ; काय सुरू? काय बंद राहणार?

मुंबईः केंद्र सरकारने कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर राज्य सरकारनंही पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसंच, १ ऑगस्टपासून मिशन बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात येणार आहे. सराकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात काही बदल करण्यात आले असून मॉल्स आणि मार्केट ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मिशन बिगिन अंतर्गंत निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊन दरम्यान काय सुरू आणि काय बंद राहणार ?
अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सुरू राहणार
मार्केट, आणि इतर दुकाने सकाळी ८ ते संध्याकाळी ७पर्यंत सुरू राहणार असून मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकाने उघडण्यास परवानगी
५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू राहणार. मात्र, मॉलमधील फुड कोर्ट, सिनेमागृहावर बंदी कायम पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपलं किचन सुरु ठेऊ शकतात.
बांधकाम व्यावसायिकांना काम सुरू ठेवण्यास परवानगी, मान्सूनपूर्व काम रखडली असल्यास काम सुरु करता येणार
रेस्टॉरंट व मोठ्या हॉटेलना होम डिलिव्हरीसाठी परवानगी
ऑमलाइन- डिस्टन्स लर्निंग अॅक्टिव्हिटी सुरु ठेवता येणार
खासगी कार्यालये कर्मचाऱ्यांच्या १० टक्के व १० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करता येणार
सरकारी कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार
स्विमिंग पूलवर बंदी कायम
५ ऑगस्टपासून मैदानी खेळ पुन्हा सुरु करता येणार, मात्र, लॉकडाऊनच्या नियमांचे बंधन कायम असणार
ऑनलाईन/ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन शिक्षण सुरु राहणार
केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा सुरू राहणार
अत्यावश्यक सेवा आणि कार्यालयीन कामासाठी जिल्हांतर्गंत प्रवास करता येणार.
लग्न समारंभसाठी सरकारनं २३ जूनला जारी केलेले आदेश कायम असणार आहेत.
वृत्तपत्र प्रिटिंग आणि वितरणाला परवागनी आहे
खासगी वाहनांचा वापरही फक्त अत्यावश्यक असल्यास करण्याच्या सूचना
दूचाकीवरून प्रवास करताना हेम्लेट बंधनकारक आहे तसंच, चारचाकी वाहनासाठी फक्त ३ माणसांना परवानगी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!